About Us

               विवेकानंद कॉलेज मधील मराठी विभागाची स्थापना इ. . १९६४  मध्ये झाली असुन साहित्य, कला , क्रीड़ा  व विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नावलौकिक प्राप्त केला आहे. आतापर्यंत या विभागातील अमर कुलकर्णी,  ऋचीका खोत व संतोष भणगे यांनी नाट्यकलेच्या क्षेत्रात पदवित्तर शिक्षण  घेवून यश संपादन केले आहे. यापैकी  दोघांना शिवाजी विद्यापीठाचा शहीद तुकाराम ओंबाले पुरस्कार प्राप्त झाला आहे. कु. रेश्मा लव्हटे, कु. भाग्यश्री रेडेकर व कु. स्वाती शेटके यांना शिवाजी विद्यापीठात  मराठी विषयात सर्वप्रथम असुन एकूण ६ पुरस्कार प्राप्त झाले आहेत . भाग्यश्री रेडेकर, रेश्मा लव्हटे ह्या नेट परीक्षा पास झाल्या आहेत.  कु. आसावरी नागवेकर , कु. अक्षय पोळके , कु. सुशांत सर्वगौड़े कु.ओमकार बुचड़े हे विद्यार्थी कला क्षेत्रात कार्यरत आहेत. मराठी विभागप्रमुख प्रा. बी. के. गोसावी  यांनी या महाविद्यालयाच्या  अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहेपाठ्यपुस्तक निर्मितीसाठी प्रा. बी. के. गोसावी व  प्रा. डॉ. प्रदीप पाटील यांनी बी. ए. भाग १ साठी अवकाश व संवाद या दोन पाठ्यपुस्तकांचे महत्त्वाचे काम केले आहे. विभागातील प्राचार्य डॉएच. बी. पाटील यांनी दहा वर्ष प्राचार्य पदाची बाजु सांभाळली आहे. तर विभागप्रमुख म्हणून डॉ. डी. ए. देसाई यांनीही महाविद्यालयाच्या विकास कामकाजात सुमारे ३० वर्षे योगदान दिले आहे .  बी .के . गोसावी  यांना कथा, कविता या साहित्यलेखनातून  कै.सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार, औदुंबर, साहित्य कला यात्री, कवी जगदीश खेबुडकर, पुणे, कथेसाठी दमसा पुरस्कार, कोल्हापूर, राजश्री  शाहू पुरस्कार, थेरवाडी असे  अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांनी भूमिपुत्र व फलाट य चित्रपटांसाठी गीत लेखन केले आहे. डॉ. प्रदीप पाटील यांनी  शरदचंद्र चटर्जी यांचे मराठीतील अनुवादित साहित्य या  विषयावर शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे.  यशवंतकीर्तिवंत व  गुणवंत विद्यार्थी  घडविण्यासाठी हा विभाग सतत कार्यरत आहे.




No comments:

Post a Comment